STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

निसर्गराजा

निसर्गराजा

1 min
408

हिरवाई दाटे, मंद गार वारा

खुललासे इथे, निसर्ग हा सारा ....!! १ !! 


निळाईच्या लाटा, अपार अथांग 

टाकताचि पाय, उमटे तरंग....!! २ !! 


ताड माड वृक्ष, उंच उंच झाडे

नारळ पोफळी, डौलामधे वेडे....!! ३ !!


लाटांवरी लाटा, भरतीची दाटी

चिंब भिजे देह, सुख गळाभेटी....!! ४ !! 


निसर्गाचे दान, दुधाळ सागर 

पाहता लोचनी, भासे नवथर !! ५ !!


बोटीतूनी जाता, सागर कुशीत

वेगवान मन, तुषार शिंपीत....!! ६ !!


उंच आकाशात, विहरू मजेत

निळाई पसरे, अंबर कवेत......!! ७ !! 


सागर अथांग, ठाव घेई दृष्टी 

कातर हृदय, भिरभिर सृष्टी.....!! ८ !!


निसर्ग हा रम्य, डोळ्यांत माईना

परतीची वाट, पाऊल पाहीना......!! ९ !! 



Rate this content
Log in