STORYMIRROR

Trupti Naware

Others

4  

Trupti Naware

Others

निरोपसमारंभ

निरोपसमारंभ

1 min
27.8K


साजरा करायचा आहे

तुझा निरोपसमारंभ

कळत नाही कसा

करु मी प्रारंभ

तो उत्सव आणि उत्साह

तुझ्या येण्यासारखा असावा

काळोखानंतरची आठवण जशी

राहते पहाटेत जिवंत ..

आता वेळही लक्षात नाही

दिवसही आठवत नाही

पण आस उफाळून येते नि

डोळ्यात आसवं भरली तुडुंब ..

नजराणा असा द्यायचाय

कि नजरेत राहील कायमचा

केशरी फुलातला माञ

विरलाय आनंद ..

तुझी जाण्याची वेळ

जवळ येते...

तुझी जाण्याची वेळ जवळ येते

बघते,बोलते,नि हसून

करते आकान्त...

औक्षण करु मी चंद्राने

कि ओवाळून टाकू चांदणं...

ओशाळलेली तुझी नजर

परतीच वाटतं मग देणं..

वेचता न येणाऱ्या पाकळ्या

वेचुन सार्या झाल्या

इतकी सावरले मी आता

कशाची करावी खंत ???

साजरा करते आहे

तुझा निरोपसमारंभ

वळुन बघु नकोस मागे

पुन्हा गुंतशील..अडकशील

होणार नाही कधीच

यातनेचा अंत

साजरा करते आहे

तुझा निरोपसमारंभ !!!!!



Rate this content
Log in