STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

निर्णय...!

निर्णय...!

1 min
222


निर्णय...!


द्विधा मनस्तीतीत होरपळताना

जीव कासावीस होतो

हे का ते च्या द्वंद्वात

जीव नकोसा वाटतो


सासू सुनेच्या भांडणात

सास भी कभी बहु थी आठवते

मुलाला मात्र उंबऱ्यावरच

मुलगा की नवरा च्या द्वंद्वात जळावे लागते


इथे पारडे जेंव्हा सत्या ऐवजी

प्रेमाने करुणेने जड होते

तेंव्हा तेच सत्य म्हणून

खऱ्या अर्थाने सामोरे येते


जीवनात प्रमाणिकते पेक्षा

करूणेलाच जास्त मोल आहे

कारण करूणाच जीवनात

खरे अंतिम सत्य आहे....


सत्यमेव जयतेचे सत्यच

करुणेत सामावले आहे

म्हणून करुणे मुळेच सदैव सत्य

त्रैलोकी त्रिकाल जीवंत आहे.....!


सुप्रभात...!


Rate this content
Log in