नीरजा(321123)
नीरजा(321123)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
प्रारंभ ...!!!
प्रारंभ निर्जाचा केला
आनंद झाला
मला
तुला
काय सांगू
आजच प्रारंभ झाला....
एकच प्रयोग केला
अक्षर नीरजा
लिहिली
वाटले
नविन काहीतरी
घडल्याचा साक्षात्कार झाला...
नीरजाकार आले धावून
नियम घेऊन
माझ्यापुढे
वाटले
काय चूकले
माझे देवा लिहून....
सहज नवीन प्रकार
बाहेर पडला
साक्षात्कार
घडला
नियम अंगावर
येता झालो बेजार...
म्हंटले देवा आता
वाटणारे लिहावे
वाचावे
म्हणावे
काय करणार
परमेश्वरा मला सुचता.....
सकल नीरजा लेखणीला
केला सलाम
मनोभावे
सुचता
काहीतरी अचानक
लिहिले मनापासूनी वाचण्याला....!
माझी पहिली नीरजा कविता मान्यवारांसाठी.!