Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bhagyashri Chavan Patil

Others

3  

Bhagyashri Chavan Patil

Others

निघालास बाप्पा ठीक आहे

निघालास बाप्पा ठीक आहे

2 mins
294


निघालास बाप्पा ठीक आहे..

तुझी पूजा प्रार्थना करण्यात वेळ कसा निघून गेला कळालच नाही

तुझ्या साठी अजुन खूप काही करावं असं वाटतं आहे पण तू निघालास बाप्पा ठीक आहे..


ओठांवरती हसु आणि डोळ्यात मात्र पाणी आहे..

सवय झाली होती तुझ्या असण्याची तुला हसताना पाहण्याची 

पण तु निघालास बाप्पा ठीक आहे..


तुझ्या मुळे घरातले लोक सगळे एकत्र आले

तुझ्या भक्तीत तल्लीन होऊन

मन अगदी मंत्रुग्ध झाले आणि आनंदी झाले..

पण तू निघालास बाप्पा ठीक आहे...


जगावर हे संकट उभं राहिलं आहे तू हे लवकर दूर कर पण

तुझ्या येण्याने सगळेच जण तुझ्या नावाच्या जयघोषात रममाण झाले

कारण तुझ्यावरची श्रद्धा अजुन कायम आहे..

पण तु निघालास बाप्पा ठीक आहे..


गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हे म्हणता सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरते

तुझे लाड करता यावे म्हणून घरो घरी धावपळ दिसून येते 

पण तू निघालास बाप्पा ठीक आहे..


सकाळी तुझी गाणी ऐकता आम्ही सगळे ही त्या गाण्याबरोबर गुण गुणु लागतो

तर कधी एकच गाणं मनापासून पाठ करतो काही सवयी नुसार

गाणी आपोआप पाठ होऊ लागतात 

पण तु निघालास बाप्पा ठीक आहे..


या वर्षी दंगा मस्ती कमी होता सगळं अगदी शांततेत पार पडले

याचा आनंद तुला झाला असेल कारण माणसे जरी दूर असली तरी

मनाने ती तुझ्यापाशी आहेत पण तु निघालास बाप्पा ठीक आहे..


तुझ्याशी बोलण्याची सवय झाली होती सगळं काही तुला सांगितलं

की मन अगदी प्रसन्न होते कारण आम्ही मागायच्या आधीच तु खूप भर भरून देतोस

आणि माझा लाडका बाप्पा होतोस पण तु निघालास बाप्पा ठीक आहे..


मनावर संयम आणि सण ही शांततेत पार पडू शकतो याची ही प्रचिती देवा

तुम्ही दिली आणि सगळ काही बाप्पा तूच निभावून नेतोस पण तु निघालास बाप्पा ठीक आहे..


मनावर दगड ठेऊन तुला आम्ही सगळे एकत्र निरोप देत आहोत

तुझ्या डोळ्यात असणारे पाणी अजूनच तुझे जाणे जड करते आहे

पण तू निघालास बाप्पा ठीक आहे..


चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी आमची आरती पूजा अशीच गोड मानून घे

आणि असच आमच्या घरी राहायला परत परत ये पण तु निघालास बाप्पा ठीक आहे..


गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत तुझा मी निरोप घेतो

तू आता स्वतःची काळजी घे तुझा हा प्रवास सुखकर होऊ देत

अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो पण तु निघालास बाप्पा ठीक आहे..


Rate this content
Log in