STORYMIRROR

Aruna Garje

Others

2  

Aruna Garje

Others

नि:शब्द.....

नि:शब्द.....

1 min
13.7K


मला आवडते कविता

सहज सोपी सरळ

वाचतांना मनातील

निघून जावी मरगळ

 

कवितेला असावा

मातीचा गंध

फुलला जणू अंगणी

प्राजक्त अन् निशिगंध

 

त्यात नको रुपक

नको त्यात अलंकार

असावे शब्द असे

जे काळजाला भिडणार

 

नदी झरयांची खळखळ

पानांची सळसळ

निरागस बालकाचे हास्य

तशीच अगदी निर्मळ

 

जमेल का मला

अशी एखादी कविता

ज्या कवितेची मीच

कर्ता आणि करविता

 

आठवणीतले काढते शब्द

होते थोडीशी स्तब्ध

उतरवू पाहते कागदावर

शब्द गायब मी नि:शब्द


Rate this content
Log in