नातं तुझं माझं
नातं तुझं माझं


दूर जातांना एकदा
तू वळून बघायचं होत
तुझं माझं हे नात
थोडं जपायचं होत
हाक मारायचं होतं
पाठ फिरवली तू
गुपित अश्रूंना तुझ्या
थोडं समजायचं होतं
काय हरवलं आपल्यात
एकदा सांगायचं होतं
धरला होता तू अबोला
कारण तोडायचं होत
तुला हसताना बघून
थोडं गोंधळायच होत
तुझ्या जवळ येऊन
तुला ओळखायचं होतं