नातं मैत्रीचं
नातं मैत्रीचं
1 min
364
नाते तुझे नि माझे
सा-या नात्यांपलीकडचे
भावनांचे सुंदर बंध
नाव मैत्री तयाचे।। १।।
आयुष्यात येते दुःखाची लाट
कठीण होऊन बसते वाट
तेव्हा येते सावरायला
मैत्रीच असते आधाराला।। २।।
मैत्री तप्त उन्हातली सावली
आल्हाददायक वाटणारी
वसंतातल्या गुलमोहरासारखी
हळुवार फुलणारी।। ३।।
असं कुणीतरी असतं
जे संकटात धावून येतं
चुकीचं करत असताना
हात धरून हक्काने थांबवतं।। ४।।
सर्व जग जरी दुरावलं
तरी मैत्रीचे घट्ट बंध तुटत नाही
नातं मैत्रीच अनमोल असतं
त्याची किंमत कुणीच करू शकत नाही।। ५।।