नातलग
नातलग
1 min
29.2K
वैभवाची गंगा
आहे रें जोवर
आहेत तोवर
नातलग
पैसा झाला आता
आप्त इष्ट सारे
वाटती निखारे
नातलग
रचतात कट
सारतात दूर
झाले रें फितूर
नातलग
मतलबीपणा
त्यांचा झाला अती
पैशाचे सोबती
नातलग
भरपूर केला
मान-अपमान
असे हे महान
नातलग
