STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

नाते बहीण भावाचे

नाते बहीण भावाचे

1 min
743

असे अतूट प्रेमाचे

नाते बहीण भावाचे

युगा पासून गाजते

प्रेम एक दुसऱ्याचे


एका आईच्या उदरी

जन्म दोघेही घेतात

थोडे रुसवा फुगवा

कधी खेळ खेळतात


जाते बहीण भावाची

लग्न होऊन सासरी

भाऊ कावरा बावरा

सुनी  वाटते ओसरी


श्रावणाच्या पुनवेला

रक्षा बंधन सणाला

भेट बंधूची घ्यायला

ताई  येते माहेराला


धागा राखीचा प्रेमाने

ताई बांधते भावाला

भावासाठी दीर्घायुष्य

सुख मागते  देवाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन