STORYMIRROR

Nalanda Wankhede

Others

3  

Nalanda Wankhede

Others

नारी

नारी

1 min
822


नारी आहेस तू प्रेम, श्रद्धा, विश्वास

तुटत्या धाग्याची एकच आस

प्रत्येक जीवाचा तूच आधार

धगधगत्या वनात मोकळा तूच श्वास


द्वेषाच्या जगात तूच आहेस करुणा

जगण्याची पूर्ण करतेस तूच संकल्पना

ऊठ, सांभाळ आपल्या अस्तित्वाला

जीवनाची नाही करू शकत तुझ्याविना

कल्पना


विविध रूपे घेऊनी विविध नाते जपतेस

मातीसारखी यातना दुःखाच्या सहन करतेस

फिरतो भ्रमरासारखा पुरुष अवतीभवती

शाश्वत सत्या सारखी तू ठिकाणी एकाच उभी राहतेस


नदीच्या पुरातील तूच आहेस मृदा

पौर्णिमेच्या चंद्राचा तूच गं गारवा

नारी समुद्राच्या लाटांचा तूच शिरवा

कुटुंबाच्या सुखाचा तूच गं निवारा


नारी नाही तुला आदी आणि अंत

कणाकणात आहे तुझाच अंश

तुझ्याशिवाय घर भासे वाळवंट

क्षणोक्षणी होतो जसा सर्पदंश


नारी, जप तू स्वतः ला

प्रत्येक दिवस तुझा खास आहे

हक्काचा मान सन्मान नारीशक्तीचा

प्रत्येक माणूस तुझाच कर्जदार आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन