नारी शक्ती
नारी शक्ती
1 min
182
प्रेमाची अन् त्यागाची
सुंदर दिव्य तू मूर्ती
स्वकतृत्वाने उजळल्या दिशा
पसरली जगी किर्ती
यमालाही हरवलेस
अशी तू पतिव्रता
काळही थरकापे
पावित्र्य तुझे पाहता
देव दैत्य झाले नत
अशी तू आदिशक्ती
तिन्ही लोकांचा राजाही
करितो तुझी भक्ती
सामर्थ्यवान आहेस तू
ओलांडले समुद्र सात
धैर्यवान तुझ्यासम
दुजा नाही जगात
षंढयुगात सारे या
समजत होते तूज अबला
नारी शक्ती दाखवून जगाला
जाहलीस तू सबला