नारी रूपे
नारी रूपे
1 min
526
नारी जन्मा, तुझी कथाबीज धारिणी, जननी,
अन्नपूर्णा, रणचंडी,भार्या, माता, तू भगिनी,
लक्ष्मीबाई, तू जिजाऊ,हिरकणी, पन्ना दाई,
किती तुझ्या गाथा, व्यथा, कशी करू उतराई!
कर पादाक्रांत मेरू, तुला न कुणाचे भय,
तुझा सारा आसमंत,जग हे तुझे आलय!
कुणी विभत्स खुडले,गुल नाजुक म्हणूनी,
वरदान काट्याचे ही,डंख कर तू रोषूनी!
नारी शक्तीस गौरवू,तुझी आभाळाची माया,
यश तुझ्या हाती आहे,तुजवर दैवी छाया!