नाही मन निर्मळ ! काय करेल साबण
नाही मन निर्मळ ! काय करेल साबण
1 min
26.5K
नाही हो मन निर्मळ
काय करेल साबण !
स्वच्छ देहाची काळजी
मन दुषित ते जण !
देह विकाराचा रोग
मनी अंधश्रद्धा जागे
भूत प्रेत बाधा जसी
भोळ्या मनी का जागे ?
मन द्वेषाचे अंतरी
विष कालवे जीवनी
नको रे संदेह पेरुनी
आहे जो-तो माझा सनी
संत शिकवण मनी
ध्येय ध्यावे जीवनी
दु:ख रंजल्या जणांचे
जाणो ते सर्वा नयनी
देव माणसापरी हो
येथे पाहवा विठ्ठल
मुखी नाम ,कर्म हाती
तोच सुखी हो सकल
