नागपंचमी
नागपंचमी

1 min

229
श्रावण महिन्याच्या
उत्सवाची सुरुवात
होते नागपंचमीच्या
सणाने उत्साहात
नागोबाचे पूजन
सगळे करूया
मुक्यांवर दया
आदर रुजवूया
नागदेवतेचे चित्र
काढून रांगोळीने
पूजा घरी
करू भक्तिभावाने
उकडीच्या पुरणाची
दिंड,लाह्या
हळदीकुंकू, फुले
आपण वाहूया
झिम्मा फुगडी
फेर धरूनि
करू गप्पागोष्टी
झोका घेऊनि
करी शेतरक्षण
उंदीर खाऊन
राखी निगा
मित्र बनून