नाद तुझा खुळा
नाद तुझा खुळा

1 min

11.9K
नाद तुझा खुळा गं
फसलो मी भोळा गं
नजरेनं घायाळ केलं
माझं काळीज चोरून नेलं
विषय झाला खोल आता
जातोय तोल माझा
सावर तू माझ्या मनाला
रंग येऊ दे सखे प्रीतीला
लहर जशी खळखळ
मन होई अवखळ
शांत तुझ्या स्पर्शाने होऊ दे
मला हृदयात सखे तुझ्या येऊ दे
जीव असा लावील
तुझा बनून राहील
प्रीतीचा झुला आपला
उंच नभी जाईल