न सांगता येणारे प्रेम
न सांगता येणारे प्रेम


न कळाले तुला माझे प्रेम
न सांगता येते मला
आकाशातील चंद्रात
विरहात दिसतो तू मला
खूप आठवण येते तुझी
आसपास नसतो तू तेव्हा
हरवलेली असते मी
सोबत नसतो तू जेव्हा
भरल्या घरात वाटे एकाकी
वाटते खूप उदास
असलेत सगळे तरी
मन शोधते तुझा सहवास
वाट पाहतात डोळे
तुला एकदा बघण्यास
होतात आतुर कान
तुझी हाक ऐकण्यास
कधी कळणार तुला सख्या
झुरणारे मन माझे
तू दुर्लक्ष करतोस तेव्हा
तुटणारे मन माझे
वाटेवर चालता चालता
वळुनी बघ एकदा
पुन्हा हात हातात घेऊन
प्रेम आहे म्हण एकदा