मुलगी वाचवा
मुलगी वाचवा


जन्म घेतला मुलीचा
काय झाला माझा गुन्हा
इच्छा संपली सगळी
जगण्याची माझी पुन्हा
दिवा असला वंशाचा
जरी मुलगा घराचा
घेई जबाबदारी ती
मान ठेवी सगळ्यांचा
भेदभाव लावी जीवा
घोर जगण्याला लई
समानता पाहण्याची
मज आता होई घाई
आई बहीण बायको
सारी कशी हवी नाती
प्रश्न पडे का साऱ्यांना
लेक घरात जन्मती
जनजागृतीचे कसे
संघटना काम करी
क्रांती घडेल तेव्हाच
वाढल्याने लेक घरी