मुक्त निसर्ग
मुक्त निसर्ग
1 min
123
नको वाटती खिडक्या दारे
नको वाटती भिंती
नको वाटती मना बंधने
नको मनाला भिती
मुक्तपणे मन्मन संचारे
हिमशिखरांवरी
गर्द घन हरित संगती
व्याप ताप विसरी
अथांग जलाशयावरती
अलगद फिरावे
क्षितीजाची न क्षिती उरावी
पार करुनी जावे
रंग गंधित सुंदर बनी
मी गंधाळून जावे
नाजूक गंधित रंगकोषी
मी भान हरपावे
सप्तसुरांच्या झंकारातूनी
नादब्रम्ह भेटावे
रंग गंध नाद लपेटूनी
षडरिपू विरावे
खिडक्या दारे बंद मनाची
उघड रे मानवा
निसर्गराजा साद दे तुला
प्रतिसाद द्यावा
