मुखवटे
मुखवटे
1 min
1.3K
घालून नकली मुखवटे
खेळू नये कधी कुणाशी,
नात्यांची खोटी बंधने
जोडू नये कधी कुणाशी.
स्वार्थ साधण्यासाठी कधी
तोडू नये कुणाच्या भावना,
मतलब पाहून स्वत:चा
देवू नये कुणास यातना.
खोटेपणाचा मुखवटा कधी
नसतो आयुष्य घडवत
धोका देवून आपणच
बसतो माणुसकी हरवत.
सच्चेपणाला नसते कधी
जगात कशाचीही तोड,
जोडण्यास सुंदर नाती
फिकी पडते मुखवट्याची जोड.
सतर्क राहावे सदैव आपण
मुखवटाधारी लोकांपासून,
रक्षण करता येईल स्वत:चे
तेव्हाच विश्वासघातापासून.
