*मर्यादा या मनाच्या*
*मर्यादा या मनाच्या*
1 min
14.7K
कितीदा मी पाहिले
पैसे रस्त्यात पडलेले
पण कोणीही नाही उचलले
आहेत मर्यादा या मनाच्या
आपले आई अन बाबा सुखात
म्हातारपण आले म्हणून
नाही सोडले वृद्धाश्रमात
आहेत मर्यादा या मनाच्या
माणूस माणसाच्या सुखदुःखात
एकमेकांना सामावून घेतात
नाही हेवादावा करत
आहेत मर्यादा या मनाच्या
पैशाच्या मागे नाही माणूस
माणूसपण जपतोय माणूस
नात्याची राखतोय जाण माणूस
आहेत मर्यादा या मनाच्या
नवरा बायकोतील संवाद
होवू नये कधी वादविवाद
साधावा नेहमीच सुसंवाद
आहेत मर्यादा या मनाच्या
