STORYMIRROR

Ankit Navghare

Tragedy

3  

Ankit Navghare

Tragedy

मरावे कसे

मरावे कसे

1 min
11.7K


जगण्याची रित कळली 

आता सांग मरावे कसे 

भगवंता सांग मेल्यानंतर 

मी विश्वात उरावे कसे


लेकरे उपाशी सारीच मग मी 

माझ्या पिल्लांना चारावे कसे 

चोरून लुबाडून लोकांना खिसे 

माझे तरी मी भरावे कसे


मी ही एक अपराधीच कुणाला

तरी उराशी धरावे कसे 

अर्धेलेले दुनियेतले सारेच हे

यांना आता मारावे कसे


पाहता इकडे तिकडे दु:ख

मी मग आज हसावे कसे 

नाही कुणी आपला इथे 

कुणासाठी रूसावे कसे


दिसते हार माझी समोर

मग युद्ध करावे कसे

वार होताहेत माझ्यावर मी 

तटस्थ बसून हरावे कसे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy