मराठी राज भाषा दिन
मराठी राज भाषा दिन
मराठी आपली मायबोली,
मराठी आपला बाणा
मराठी असे अभिमान
जन्मले या मातीत
हे माझे सौभाग्य हाच
माझा स्वाभिमान
परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत ही
आपली मायबोली मराठी
अंगाई ,लावणी, अन् पोवाड्यात अधिक शोभून दिसती
संस्कृत अन् संस्कृतीच्या
उदरात वसे नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतत दिसे
समृद्ध भाषा ही प्रत्येक गोष्टीवर अगदी प्रत्येक भावनेवर
शब्दात गुंफलेल्या
अप्रतिम कविता प्रत्येकाच्या
मनावर राज्य करे
विविध प्रकारच्या
अध्यात्माची ज्योत
ज्ञानाचा अथांग श्रोत ,
भडकली तर तोफ फेकली तर गोफ
समानतेची तिला जाणीव,
नाही तिच्यामध्ये कशाची उणीव
प्रयत्नातील जिज्ञासा
कल्पनेतील चिकित्सा
नात्यागोत्यातील भरवसा
मराठी भाषा,मराठी मनाचं मराठी लेण
खरंच कौतुकास्पद वाटत मराठमोळ जगणं
मराठी प्रत्येकाच्या हृदयाचा झंकार,
मराठी सर्व यशाचे द्वार
"अमृतातेही पैजा जिंके"
ज्ञानोबा सांगती
मराठीला जराही
लेखू नका कमी
शक्य होत असेल तर
मराठीतून बोला
नेहमीच ठेवा हे ध्यानीमनी
आज जागतिक
मराठी राजभाषा दिवस
ज्ञानपीठ पुरस्कार
सन्मानित कवी श्रेष्ठ
कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस
साहित्यिक विश्वातले एक
अद्वितीय व्यक्तिमत्त्व
दिले ज्यांनी महाराष्ट्राच्या
सांस्कृतिक क्षेत्रामध्ये
मोलाचे योगदान
प्रत्येक मराठी
माणसाचा अभिमान
साहित्य प्रांगणात अखंडपणे चमकणाऱ्या
तेजस्वी तार्यास माझा प्रणाम
मराठी आहे आपली राष्ट्रभाषा
सर्वांनी मनी रुजवावी हीच अभिलाषा...
