मोठ्ठी रात्र!
मोठ्ठी रात्र!
मोठ्ठी रात्र...!
मोठ्ठी मोठ्ठी रात्र
पाचवीला पुजली
आज नवीनच
उठली खूजली
अशा कित्येक रात्री
पीडण्यासाठी आल्या
आणि कित्येक रात्री
अश्याच जागरणीत गेल्या
भय आता रात्रीचे
काहीच उरले नाही
ती लहान असो की मोठ्ठी
काहीच फरक पडत नाही
दिवसा डोळे
झाकता येत नाहींत
रात्रीस ते कधी
लागतही नाहीत
चिंता विवंचना
तशी कोणती उरली नाही
तरी ही गट्टी
निद्रेसी कधी जमली नाही
आणि आज मोठ्ठी रात्र
म्हणून तो भय मज दाखवतो
आणि उगाचच
माझी पुन्हा फिरकी घेतो
त्याला त्या विधात्याला
आज म्हंटले मी
जा हवी तेवढी रात्र मोठ्ठी कर
ज्याला कर नाही त्याला कोणती डर
मस्त मजेत मी वेड्या
कविता करतोय आणि
तुझ्या मोठ्या रात्रीचे पण
बघ चांगलेच बारा वाजवतोय....!
