मोर
मोर

1 min

335
मोर
सुंदर मान
शोभे डोक्यावर तुरा
असे भगवान कार्तिकेयचे वाहन
मोर
बेधुंद होऊनी
आकर्षित करी सख्यास
नृत्य करी पिसारा फुलवुनी
मोर
भारताची शान
देखणा राजबिंडा तो
पटकावला राष्ट्रीय पक्षाचा मान
मोर
त्याची बघण्यास
एक झलक खास
गर्दी करिती जन हमखास
मोर
आनंदी होई
नभातून बरसणाऱ्या पावसात
चिंब भिजण्याची त्यास घाई