STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Others

3  

गोविंद ठोंबरे

Others

मोक्ष

मोक्ष

1 min
12.3K


सांज रातीच्या वेळेला

चिऊ बाळाच्या घासाला

बाई घरट्यास माझ्या

फांदी मोडली मोक्याला


घाव सैतानी हाताचा

दाणा चोचीचा सांडला

पंख वाऱ्याला भिडून

सारा संसार मोडला


तिथं बोडक्या रानात

कोंब कोमेजून गेला

झाड पानाच्या कुशीत

विस्तवाचा रोग आला


माणसाच्या घरट्याला

माझ्या फांदीचा उंबरा

झुला त्याच्या तान्हुल्याचा

कसा झुलतो साजरा


आता सगळ्या जीवास

घोर पाण्याचा लागला

खोल खोल भुईमधी

खडा तान्ह्याजून गेला


सांग हिरव्या कायेच्या

माना किती तोडशील

बिना घरट्याचा काऊ

मोक्ष कुणाला देईल ?


Rate this content
Log in