मोकळे आकाश...
मोकळे आकाश...
1 min
755
नात्यातला विश्वास
श्वास नात्यांचा राहे
काय उपरी याच्या
माझे खास आहे?
शरीर कोठे जोडती
बंधने या मनाची?
स्पर्शात हवेला
त आस-पास आहे!
होता वेदना तुला
दाटती कंठ माझे
कोण जाणे कसे
हे मोहपाश आहे?
हवे आता कोठे
वेगळे ते काय?
जपल्या आठवणींची
मनात रास आहे
जपतोय आता तेच
आधार भविष्याचा
केली गुंतवणुक जी
हर क्षणास आहे
कसे करू मी आता
मागणे नक्षत्रांचे
सोबती दिले जे
मोकळे आकाश आहे
