मनोगत
मनोगत
कुणास ठाऊक कसे आले चिमणीच्या मनात करावे आपले मनोगत व्यक्त माझ्या पाशी ...
आली ती आणि म्हणाली...
काय झालंय तुम्हा सगळ्यांना केलंय बंदीस्त तुम्ही घरात स्वताला...
आकाश ही स्वच्छ दिसु लागलय...
नाही विमानाची रहदारी ...
नाही जिवाची काळजी...
मनसोक्त उडण्यासाठी आकाश मोकळं करुन दिलंय तुम्ही....
वरुन डोकावले तर रस्ते ही पडले ओस
वाहनांच्या धुराचा नाही जोर ..
मनुष्याची अतिक्रमण पोहचली होती जंगलवस्तीत ...
आज मात्र आम्ही मनसोक्त बागडतो तुमच्या वस्तीत ...
विचारही केला नव्हता की आमच्यासारख्या जिवांसाठी पण असा दिवस येईल ...
जो माणसाच्या रहदारीपासून आम्हाला दुर नेईल...
