STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

मनीषा....!

मनीषा....!

1 min
340


साधं सोपं जीणं असावं

लुडबुडणार कोणी नसावं

कासवा सारखं संथ असावं

सस्या सारखं सैराट नसावं


विचार मंथन त्यात असावं

पण त्यात गुंतणं नसावं

सदाचाराचं कोंदण असावं

पण अनाचाराच आंदण नसावं


प्रेमासाठी आतुरं असावं

पण कधी लाचार नसावं

एकटक तिला पहावं

तिथे कोणी खरेच नसावं


तिने मला एकदा पुसावं

उत्तरात मी बेईमान नसावं

तिच्या डोळयांत प्रेम असावं

हृदयात माझ्या पाप नसावं


एकदा तिला मी जाणाव

जाणता जाणता पुसावं

तेंव्हा तिच्या डोळ्यात

कोणतेही भय नसाव


असा माझा मानसअसता

तिने मला फक्त हो म्हणावं

हे सार स्वप्नात नसावं

सारं काही सत्यअसावं


सत्या साठी जगणं असावं

निरर्थक वर्तन नसावं

प्रेमासाठी तुझं वास्तव्य असावं

साक्षीला कोणीच नसावं


स्वप्न असले जरी हे

तरी ते तुला दिसावं

एकदा तरी मला तू

जगण्या साठी पुसावं


दोघांसाठी सारं असावं

जगासाठी काही नसावं

डोळयांत मी तुझ्या

सदैव मी मलाच पाहावं


साधं सोपं जीणं असावं

खोट काही त्यात नसावं

तुझ्या नी माझ्या प्रेमासाठी

जगणं आपलं सार्थ ठराव.....

जगणं आपलं सार्थ ठराव ..!!!!""


Rate this content
Log in