मंगळवार...!
मंगळवार...!
1 min
920
मंगळ कुंडलीत येता
गळपटी उपवरांची धरतो
लज्जा रक्षणार्थ मग
वाट काढण्यास सांगतो
रक्षण कर्ता कुंडली बहाद्दर
मग प्रेम विरास वेठीस धरतो
मंगळाचा अमंगल फेरा
जीवनी फेर धरतो
अंधश्रध्येची साडेसाती
शनी पाठ धरुनी बेजार करतो
वाट लावूनी जीवनाची
मग श्वास घेतो
विज्ञान युगातही हा मंगळ
अमंगल करू पाहतो
ज्या मंगळावरी
आता आपण पाय ठेऊ पाहतो
जागे व्हा मुलांनो
मंगळवारीच मंगल सांगतो
भित्या पोटीच बाबा
ब्रम्हराक्षस जन्म घेतो....!
