मंगळवार सुप्रभात..!
मंगळवार सुप्रभात..!
1 min
28K
तो हळू हळू जसा
अवतरत होता
तसा गारवाही
गार गार गोड वाटत होता
कोवळ्या पानांवर
मोती साठवत वाढवत
चमकवत तो
नजरेस सुखावत होता
म्हंटले त्याला हीच
किमया साऱ्या जगतास पाहू दे
जिथे जिथे जाशील तिथे
हाच अनुभव येऊ दे
तो हसला थोडासा
आणखीन प्रकाशित होऊन
म्हणाला सांग त्यांना
या म्हणावे रोज सकाळी चहा घेऊन...!
