STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

4  

Abasaheb Mhaske

Others

मनासारखे जगून घेऊ

मनासारखे जगून घेऊ

1 min
180

यशाचे धनी सर्वच होतात ...

अपयशाचा नसतो वाली कुणी

वेळ निघून जाता कळून येते ....

स्वार्थी जत्रा सारी , कुणी न कुणाचा 


माझे- माझे , कबाड ओझे ...

संकट समयी कुणी ना आले

एकटंच चालायचं ठरलं आता

आपलं आपण होऊ दिलासा...


विश्वासाचे खांदे न उरले...

सारे अंदाज खोटे ठरलें

सगे- सोयरे , कोण कुठचे

असतील शिते तर जमतील भुते ...


दोष कुणाला कशास द्यावा...

आपले पाप आपल्याच माथी 

खडतर रस्ता, प्रवास निरंतर ...

मनासारखे जगून घेऊ नकोच नंतर


Rate this content
Log in