STORYMIRROR

Nalanda Wankhede

Others

3  

Nalanda Wankhede

Others

मन

मन

1 min
454


मन वेडे माझे

मनाशिच जुळले

मनातच डाव मांडीला

मनातच खेळले


मन असते सुंदर

मन असते मंदीर

मन असते मधुशाळा

मन असते गंभीर


मनाची धार

मनालाच विचार

मन असते मधाळ

मन असते रसाळ


मन असते रानपाखरु

मन असते गायीच वासरू

मन असते फुलपाखरु

मन असते सुखाच लेकरु


मन असते निसर्गाची सहल

मन तारुण्याचा बहर

मन असते रंगमहल

मन जिद्दीचा कहर


मन असते पुरणपोळी

मन असते सौंदर्याचा ठेवा

मन असते संताची झोळी

मन असते झंझणीत मेवा


मन पिसाट वारा

मन विणेच्या तारा

मन वादळ वारा

मन पाउसाच्या गारा


आपल्या अस्तित्वाची

आपल्यालाच जाणीव असावी

कर्तव्याची शिड बांधून

जीवन नौका हाकावी


Rate this content
Log in