मन...!
मन...!
मनास मी विचारले
काय वाटते रे तुला
मन म्हणे मला
काय सांगू मुला....
मी नाराज नाही
पाहुनी सभोवार
पाहतो मी सारे
पुन्हा पुन्हा एकवार
सत्य असत्य
सारे साक्षेपीच आहे
जनता जनार्धन
सारे ठरवत आहे
वारे वाहतात असे
कोलमडून सत्य पडते
म्हणुनी बाळा
असत्याचेच पारडे जड होते
प्रगतीच्या महा यज्ञात
आहुत्या अनेक पडतात
प्रत्येक आहुत्या
वेगळेच दर्शन घडवतात
बेजार मी नाही
की मी साशंक
तरीही सांगतो बाळा
तटस्थ मी निशंख
जे जे होते आता
ते ते मी पाहतो आहे
परिणामाची तमा न बाळगता
आनंदी जीवन कंठतो आहे
मन बोलले इतुके मज
आज चाळवता त्यास
सुखाचा पुरता पडला
गळून लीलया ध्यास....!
