STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Others

3  

Sheshrao Yelekar

Others

मन

मन

1 min
536


मन पाखरू पाखरू

त्याची चाल तूरु तूरू

चिमणी दाणा टिपत फांदोफांदी

तसा उडे भूरु भूरु


स्थिरावेना एका जागी

हवे नव नवे फळ

हर पल नवी आशा

सतत याची पळापळ


नाही रमला एकात

याची जात पळकुटी

चालतो ज्या वाटेवर

त्याला फुटतात चार फाटी


मनाचे घर मेणाचे

वितळतो लालची उन्हात

तिथं तळपून रडे

फिरतो एकांती वनात


भावना प्रियसी याची

राहे हृदयी कप्यात

विरहाचा वारा लागता

वाहे डोळ्याच्या पापण्यात


तरी मन बलवान

आहे आत्माचा प्रधान

जे जे अंत:आत्मातून

ते ते साकारतो विधान


Rate this content
Log in