मन...!
मन...!
मनातलं काहीतरी
मनातलं माझ्या
मनात काय तुझ्या
मनातलं सांग
मनातलं सांगतो
मनातलं ओळख
मनातलं ओळखलं
मन जाणतो
मन जाणलं पाहिजे
मनाचा आचार
मनाचा विचार
सारं मनासारखं
सारं मना प्रमाणे
आणि
क्षणात विचार
आला माझ्या मनात
गल्लत झाली
विचार मनात नाही आला
तो आला मेंदूत
पण मन म्हणाले
परत गल्लत केलीस
विचार मनात आला
म्हणून तो मेंदूला कळला
आता माझ्या त्या
त्रयस्थ भूमिकेला तडा गेला
आणि या दोघांच्या
द्वंद्वात अडकलो
म्हटलं खरच
मन किती अगम्य आहे
आणि
म्हणे मनावर विजय
पण खरं सांगू
हा विजय पण
परावलंबी आहे
मनात असेल तरच
तो मिळवता येतो
म्हणून मला वाटत
मन म्हणजे
दुसरं तिसरी काही नाही
मन मन आहे
मन मनाच ते नकारघंटेच
संस्काराच सावध वादळ आहे
त्या वादळाचा सकारात्मकतेने
सामना करण्याची उर्मी
मन आहे,
हे मनचं खरं जीवन आहे..
मला नको असलेली गोष्ट
नकळत सांगते
तेच खरे मन आहे....!
म्हणून म्हणतात ऐकावे जनाचे
करावे मनाचे....!!
