मन पाऊस पाऊस
मन पाऊस पाऊस

1 min

49
नभी दाटले काळे मेघ
वारा वाहे थंड गार
धुंद पावसाची रेलचेल
दिसे वसुंधरा सुंदर
रवी तो मंदावलेला
मधूनच डोकावत होता
ऊन पावसाच्या खेळात
निसर्ग सजला होता
वाढवी आभाळाची शोभा
सुरेख नक्षीदार इंद्रधनू
सप्त रंगात नाहून गेली
अवघी सृष्टी जणू