STORYMIRROR

Nilesh Jadhav

Others

4  

Nilesh Jadhav

Others

मला ना एक झाड लावायचंय

मला ना एक झाड लावायचंय

1 min
275

मला ना एक झाड लावायचंय...

प्रदूषण रोखण्यासाठी.

त्याच्या गर्द छायेत 

निवांत होऊन विसावण्यासाठी.


मला ना एक झाड लावायचंय..

पावसाने धो-धो बरसण्यासाठी.

त्याच झाडाचा आसरा घेऊन

पावसापासून वाचण्यासाठी.


मला ना एक झाड लावायचंय..

पक्षांचा किलकीलाट ऐकण्यासाठी.

त्यांच्या घरट्याकडे पाहत 

जगणं शिकण्यासाठी.


मला ना एक झाड लावायचंय..

कोंक्रेटच्या जंगलात जगण्यासाठी.

निष्पाप आणि मुक्या जनावरांच्या

"सावली"साठी....



Rate this content
Log in