Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Kale

Others

2  

Savita Kale

Others

मला जगायचयं

मला जगायचयं

1 min
239


मला जगायचयं

माझ्या गोड मुलांसाठी

त्यांच हसरं बालपण

डोळे भरून पाहण्यासाठी


मला जगायचयं

माझ्या मुलांच्या आधारासाठी

भल्या मोठ्या या जगात

त्यांनी परकं न होण्यासाठी


मला जगायचयं

माझ्या मुलांचे लाड करण्यासाठी

कोडकौतुक करून त्यांचे

हळूवार 'पापे' घेण्यासाठी


मला जगायचयं

माझ्या नव-यासाठी

त्याची सुंदर सोबत

आजन्म मिळवण्यासाठी


मला जगायचयं

माझं सुखी कुटुंब पाहण्यासाठी

नव-याला यायला उशीर झाल्यावर

आतुरतेने वाट पाहण्यासाठी


एक संधी मला दे देवा

प्रार्थना करते जगण्यासाठी

बळ मला मिळु दे आता

कोरोनाशी लढण्यासाठी



Rate this content
Log in