मकरसंक्रांत
मकरसंक्रांत
1 min
533
नववर्षाच्या आरंभास
सण येई मकरसंक्रांत
तिळगुळ वाटा साऱ्यांस
नका ठेवू कसलीच भ्रांत
गुळाचा गोडवा नित्य
ठेवा तुमच्या ओठी
तिळासारखा स्नेह ठेवून
नित्य जोडा माणसे मोठी
तीळ आणि गूळ मिळून
गट्टी जशी जमते
तशीच नात्यांची वीणही
घट्ट ठेवा असे सांगते
हेवेदावे रागरुसवे सारे
दूर करा एकमेकातून
आनंदाचे वारे वाहू दे
पतंगापरी गगनातून
सण आहे हा आनंदाचा
उत्साहाचा अन ऊर्जेचा
प्रेम स्नेह वाढू दे
आनंद लुटा या सणाचा
द्या त्या आनंदाचा तीळ
वाटा साऱ्यांना जपून
मग वाहती वारे आनंदाचे
मत्सर जाईल संपून
