मजला सराव आहे
मजला सराव आहे
1 min
17.3K
दुःखास खास माझा भलता लगाव आहे
दुःखेच भोगण्याचा मजला सराव आहे ।।१।।
माझा जणू सुखाशी झगडा जुना पुराणा
सौख्यास त्यागण्याचा मजला सराव आहे ।।२।।
गाळून आसवांना मज काय फायदा हो?
ऐसा विचार माझा असला स्वभाव आहे ।।३।।
एकेक दुःख येते मजला छळून जाते
मी बेफिकीर झाले नियतीस ठाव आहे ।।४।।
आपापल्या परीने सुखदुःख येत जाते
माझ्या घरी सुखाचा अवघा अभाव आहे ।।५।।
आले जरी घराशी सुख भेटण्यास मजला
सांगेन त्यास येथे दुःखास वाव आहे ।।६।।
