"मज हेवा तुझा रे"
"मज हेवा तुझा रे"
फुलपाखरा परी जिवन असावे,
धुंद फुलांवरून विहारावे.
पराग तोषावे, मधूकण पिऊन घ्यावे.
पंकजाशी क्षणभर गुज करावे. पंख मिटूनी त्याच्या कुशीत शिरावे,
मनाचे गुज अलगद ऊलगडावे काही मनात ठेवावे,
जमल्यास हातचे राखावे. खरच फुलपाखरा परी स्वच्छंदी असावे.
खरच हेवा वाटतो या फुलपाखरांचा जिवन क्षणभंगूर परी,
दु:खाचा लवलेशही बिल्कूल ना अंतरी.
आनंद घेती जगण्याचा
एकमेका सवेत मिसळून राह्यण्याचा.
जिवनाचे रहस्य यांना गवसले सुमना सवेत जगण्याचे इंगित त्यांना चांगलेच जमले.
ऊज्वला रवींद्र राहणे
विक्रोळी मुंबई