मीन राशी
मीन राशी
1 min
230
सतत गडबड गोंधळ
मतावर एका ठाम नाही
चंचळ चपळ व्यक्तिमत्व
पहा ही तर मीन राशी
लोभ न यांना कसला
मायेची थाप मात्र हवी
कलेने त्यांच्या घेतलं तर
ओतते जीव मीन राशी
प्रपंच अन् परमार्थाचा
समतोल योग्य राखती
कधी हट्टी कधी गुणी
अशी ही मीन राशी
संयम नसतो यांना
उथळ यांची वृत्ती
जलतत्वाची बनली पहा
ही आहे मीन राशी
