STORYMIRROR

Kalpana Deshmukh

Others

3  

Kalpana Deshmukh

Others

मीच माझा रक्षक

मीच माझा रक्षक

1 min
855


स्वयंस्फूर्तीने शासन नियम

साऱ्या विश्वाने पाळावे

मीच माझा रक्षक म्हणूनी

अंत: करणातून बोलावे ।।


कितीही आली संकटे

धैर्याने करीन मी सामना

थोडी स्वयंशिस्त लावा

ठणकावून सांगेन या जना ।।


परिवार समाजहित जाणूनी

स्विकारली मी संचारबंदी

कोरोनाविरूद्ध लढण्याची

हिच आहे खरी नांदी..


तन निरामय,स्वच्छ ठेवूनी

समाज सुरक्षित अंतर ठेवू

मीच आहे माझा रक्षक

मनामनात दीप चेतवू ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन