मी उंबरठा ओलांडला त्या क्रूर नियमांचा
मी उंबरठा ओलांडला त्या क्रूर नियमांचा


आज मी ओलांडला उंबरठा,
समाजाने ठरवलेल्या त्या नियमांचा.......
किती दिवस जगत होते, ते जाचक नियम
स्वतःवर लादून....
अखेर बांध फुटला सहनशक्तीचा.....
जाणीव झाली स्त्रीशक्तीची
आणि आठवण झाली हजारो वर्षांपूर्वी शूरवीर स्त्रियांनी
घडवलेल्या त्या शूर क्रांतीची......
मग मीही, ही क्रांतीची ज्योत तशीच तेवत ठेवायची असा
निर्धार मनात केला....
आणि ज्योतीचा तो झगमगता प्रकाश डोळ्यात साठवून,
त्या क्रूर नियमांना पायाखाली चिरडून,अखेर माझ्यासाठी
उभारलेला तो उंबरठा मी न डगमगता ओलांडला.......