मी राधिका
मी राधिका
क्षितिजाशी कृष्णमेघ का मलाच मोहविते.
माझ्यातील राधिकेस जणू श्याम खूणवितो.
फुलापाखरांचा थवा भुरळ घालतो जिवा.
स्वप्नांचे इंद्रधनू मोर मनी थयथयतो....(१)
आठवांचा पारिजात मृदुल फुले बरसतात.
प्राण पक्षी होऊनिया अंबरात भिरभिरतो(२).
r>
दिवस चिंब जादुभरे मन उगाच बावरे.
एक ध्यास नाजुकसा यौवनात मुसमुसतो(३)
श्याम रंग झुळझुळ ती धारातुनी रिमझिम ती.
साजनाची ओढ छळे पाय तिथे अडखळतो(४).