मी पाऊस बोलतो...
मी पाऊस बोलतो...
मी पाऊस बोलतो..
अचानक सरींनी झरतो मी खाली
चालावया माणसांची नित्य रहदारी
घेतो गिरकी थेंबतो जरासा
सुटतो कितींचा मनातील भरोसा
तृण खुश जरासे, जराशी धरा रे
भिजतात पर्ण, निवतात डोळे
कधी गार करतो, देतो थंड वारे
आवनात उठावे जणू, फत्त धुपारे
टपकतात थेंब, देतो दिलासा
पण माझा मला रे, नसतो भरोसा ! !
कधी दवबिंदू होवून, आरसा बनतो
मनोहर भासतो परि,नेत्री चिंब होतो
कर्क चित्र बघतो, धरणी ही उजाड
हुंबरतात ढोरं अन् घुमती गिधाडं
डोळ्यातून माझ्या वाहतात धारा
माणसाने निर्मिलेला पाहून दूरावा
वृक्षवल्ली सोयऱ्यांना, कुठेचं नाही थारा
नाईलाज माझा, मी बनलो उन्हाळा !!
