मी निसर्ग
मी निसर्ग
कधी कोणाकडे काहीच मागितले नाही..
ना कोणाकडून कधीच अपेक्षा ही केली नाही..
जेव्हा जेव्हा माझा राग अनावर झाला..
फक्त तेव्हा तेव्हा हा महापूर लोटला..
कारण प्रकृतीची हेळसांड मला कधीच रुचली नाही..
आणि कोणी एकानेही माझी विचारपूस करायला आलं नाही..
म्हणूनच की काय आज प्रत्येकावर घरात बसण्याची वेळ आली..
मला ही काही दिवसांची सुट्टी हवी होती म्हणूनच ही वेळ आली..
माझा निसर्ग माझी चिमणी पाखरं कुठे दिसेनाशी झाली होती..
फक्त तुमच्यात चुकीमुळे ती हवेत बागडताना दिसत नव्हती..
आभाळाचा पांढरा शुभ्र रंग कुठल्या वेगळाच रुपात अवतरला होता..
कारण त्यात वेग वेगळ्या प्रदूषणाने आपला वेगळा रंग त्यात आणला होता..
महापूर आला आणि कित्येक जणांची घरेदारे उध्वस्त झाली..
व्हायरस आला आणि कित्येक जणांना जगणेदेखील अवघड होऊन बसली..