STORYMIRROR

Sheetal Sankhe

Others

3  

Sheetal Sankhe

Others

मी कोण?

मी कोण?

1 min
13.3K


सहज मनात आलं 

मी कोण ...???

रेंगाळत राहीले शब्द 

निशब्द जाहले ...

मी कोण???

वळणवाटेवरील वाटसरू

की, प्रवास कधी -कुठवर 

घेवून जाईल

त्याची प्रतिक्षार्थी...

अबाधित राहीले ...

मी कोण???

संदर्भ शोधत ...

धावत -थकून जात

जीवनातील आव्हानं

 पेलवत ...

येरझार्या घालत ...

अविश्रांत झाले...

मी कोण???

उमललेले कोंब ...

उमगलेले कोश ...

भावविभोर होत ...

नेहमीच चाचपडले 

प्रश्न निपचित पडले 

मी कोण ???

हरपले क्षण ...

निसटून गेले...

वेचणारे हात जखडले 

अस्वस्थ विचार उरले...

मी कोण???

क्षणभर सारं

मनाशी पुटपुटले

संचित असेल 

वाट्याला आले....

मी कोण ,मी कोण

हृदयाशी कोहं गुंजले...


Rate this content
Log in