Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

MAHENDRA SONEWANE

Romance

3  

MAHENDRA SONEWANE

Romance

मी झालो फिदा

मी झालो फिदा

1 min
11.6K


तू लावण्यवती, सुंदर तुझी अदा 

तुला पाहून प्रिया मी झालो फिदा ||


मी चंद्र तुझा, तू माझी चांदणी 

मी सखा तुझा, नि तू माझी यामिनी ||


तुला पाहिले ना कधी मी इतके 

पाहिलेस तू मला एका नजरेनं जितके ||


एक एक श्वास जगते आता मी तुझे 

तुझ्यातच शोधते गोड अस्तित्व माझे ||


आपल्या प्रेमळ जगात आपण असे राहू 

आपले अंतर मिटवूनी एक दुसऱ्याचे होऊ ||


तुझ्या गालावर प्रतिबिंब माझ्या ओठांचे 

तू सावली माझी, मग तुझे आयुष्य कोणाचे || 


आठवणीचे आले अश्रू, येऊन तू सावरशील का 

तुझीच आहे बोलून माझ्या मिठीत येशील का ||


Rate this content
Log in